बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 30 सप्टेंबर 2023 (08:55 IST)

परभणी : गंगाखेड तालुक्यात वीज पडून मायलेकीसह 3 ठार, तीन जखमी

परभणी : गंगाखेड तालुक्यातील डोंगर पिंपळा व भंडेवाडी येथे वीज पडून मायलेकीसह तीन जण ठार ठार तर तीन जण जखमी झाल्याची घटना शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 च्या सुमारास घडली. परभणी जिल्ह्यात सध्या परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदुर पाऊस पडत आहे. शुक्रवारी दुपारनंतर अचानक आकाश ढगांनी व्यापून गेले होते.
 
सायंकाळच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाचे आगमन झाले. दरम्यान गंगाखेड तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे शेतात काम करीत असताना अचानक आलेल्या पावसामुळे अडोशाला उभ्या असलेल्या सविता विठ्ठल कतारे(40) व निकीता विठ्ठल कतारे (18) या दोघीं मायलेकीचा मृत्यू झाला तर दुस-या घटनेत भंडेवाडी येथे ओंकार किशन घुगे(14) या युवकाचा मृत्यू झाला आहे. गोविंद विनायक घुगे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी परभणीला हलविण्यात आले आहे. तर सुनिता काशनाथ शेप(48) व रेणुका काशीनाथ शेप (27) या जखमी झाल्या असून गंगाखेड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor