शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 सप्टेंबर 2023 (21:43 IST)

बापाने दिली व्यसनी मुलांच्या खूनाची सुपारी

murder
मद्यपान करून वारंवार आई-वडीलांना त्रास देतो म्हणून या त्रासाला कंटाळून बापानेच मद्यपी मुलाच्या खूनाची सुपारी दिल्याचा प्रकार सिन्नर तालुक्यात पास्ते शिवारात उघडकीस आला आहे.
 
याबाबत माहिती अशी की, व्यसनी मुलगा राहुल शिवाजी आव्हाड (वय 30) रा. पास्ते ता. सिन्नर हा नेहेमीच मद्यपान करून आई-वडीलांना त्रास देत असे. या त्रासाला कंटाळून वडिल शिवाजी विश्वनाथ आव्हाड (वय 50) यांनी वसंत अंबादास आव्हाड (वय 40) आणि विकास उर्फ बबलू शिवाजी कुटे (वय 42, दोघेही रा. पास्ते)  यांना राहुलचा खून करण्यासाठी 70 हजार रुपयांची सुपारी दिली. ही सुपारी घेणाऱ्या आरोपींनी दि. 26 रोजी पास्ते शिवारातील हरसूल फाटा रोडवर बंद पडलेल्या कालिया नावाच्या कंपनीत राहुलला नेऊन मीटर रुममध्ये नेऊन त्याची हत्या केली.
 
याबाबतचे वृत्त समजातच पोलिसांनी तपास करून पास्ते येथील तिघाही आरोपींना ताब्यात घेतले. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्याचे हवालदार मुकेश महिर यांनी तक्रार नोंदविली असून, दि. 28 च्या रात्री आरोपींना हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काठाळे हे करीत आहेत.