शनिवार, 21 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : गुरूवार, 24 ऑगस्ट 2023 (08:26 IST)

Saibaba श्री साईबाबांचे उपदेश

श्रीसाईबाबा हे भक्तांना सहज संवादातून बोध करीत. बरेच वेळा त्यांचे बोलणे गूढ व अतर्क्य वाटे. 
 
कोणाची निंदा करु नये.
सत्याने वागावे.
नीतीने धन कमवावे.
भुकेलेल्याला अन्न व तहानलेल्याला पाणी द्यावे.
गरजूंना मदत करावी.
कोणाचा द्वेष, मत्सर हेवा दावा करु नये. 
अहंकार असू नये.
अडलेल्याला परोपकारी वृत्तीने मदत करावी.
ईश्वरी सत्ता श्रेष्ठ मानून नेहमी ईश्वराचे स्मरण करावे.
वादात व्यर्थ तोंडाची वाफ दवडण्यापेक्षा अंतःकरणात परमेश्वराचे स्मरण करुन ओठातून त्याचे नाम घ्यावे.
श्रध्देने आपल्या धर्मग्रंथांचे वाचन करावे.
सतत आपल्या दैवताचे नामस्मरण करावे.
माणुसकीने वागावे, किडा, मुंगी, प्राणी या सर्वामध्ये परमात्मा लपलेला आहे. 
मनातील, हृदयातील ईश्वरावर नामाची धार अखंड ठिबकू द्यावी.
"सबका मालिक एक" हा त्यांचा संदेश प्रसिध्दच आहे. त्यामुळे शिख, हिंदू, मुसलमान, पारशी अशा सर्व समाजातीललोक त्यांचे भक्त आहेत. 
 
श्री साईबाबा फकिरी वृत्तीचे अवलिया होते. मानवाच्या सुखाचे सार त्यागात, प्रेमात, आपलेपणात, परमेश्वराच्या नामस्मरणात आहे असा त्यांचा उपदेश आहे. श्री साईबाबांना ज्या व्यक्ती अनन्यभावे शरण गेल्या त्यांचे ऐहिक जीवन सुखकर झाले, मनःशांती लाभली, त्यांचेमरण सुध्दा सूर्यास्तासारखे सहज विनासायास लाभले.