1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 23 नोव्हेंबर 2021 (12:54 IST)

प्रियांका चोप्राने नावातून वगळले जोनास नाव , घटस्फोटाची चर्चा , अभिनेत्रीच्या आईने दिले हे सडेतोड उत्तर

Priyanka Chopra omits Jonas' name
बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपलं नाव गाजवणाऱ्या प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्यात सगळं काही सुरळीत नसल्याच्या बातम्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रियांकाने तिच्या नावातून जोनास वगळल्यानंतर या बातम्यांना वेग आला. दरम्यान, अभिनेत्रीची आई मधु चोप्राने या वृत्तांवर प्रतिक्रिया दिली आहे.
प्रियांका चोप्राने तिच्या नाव समोर जोनास लिहायला सुरुवात केली, पण अचानक प्रियांका ने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून जोनास नाव वगळल्यावर,दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्या वेगाने पसरू लागल्या.  घटस्फोटाच्या बातम्यांबद्दल  प्रियांकाची आई मधु चोप्रा म्हणाल्या, 'हे सर्व खोटं आहे. अफवा पसरवू नका.