शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:53 IST)

Covid-19: प्रसिद्ध अभिनेता-राजकारणी कमल हसन यांना कोरोना, रुग्णालयात दाखल

प्रसिद्ध अभिनेते आणि राजकारणी कमल हसन यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांनी स्वतः ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. कमल हसन नुकतेच अमेरिकेहून परतले होते, त्यानंतर त्यांना खोकला आणि सर्दी झाल्याची माहिती आहे. यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली जी पॉझिटिव्ह आली. त्याच्या टीमनेही याला दुजोरा दिला आहे.  
 
अजून ही महामारी कमी झाली नाही' कमल हसन यांनी तमिळ भाषेत ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, ' आता मला समजले की महामारी कमी झालेली नाही , मला अमेरिकेच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर थोडा खोकला झाला, चाचणी केली आणि मला कोरोना झाल्याचे कळले, सध्या मी आयसोलेशनमध्ये आहे. तुम्ही सुद्धा काळजी. सध्या कमल हसन चेन्नईतील रुग्णालयात दाखल आहेत.