मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 22 नोव्हेंबर 2021 (16:44 IST)

शाहिद कपूरने शेअर केले Jerseyचे धमाकेदार पोस्टर, ट्रेलरबाबत केली मोठी घोषणा

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या चित्रपटांच्या चर्चा आहेत. काही शूटिंग सुरू असून अनेक रिलीजसाठी सज्ज आहेत. या सगळ्यामध्ये अभिनेता शाहिद कपूरचा आगामी चित्रपट 'जर्सी' प्रचंड चर्चेत आला आहे. कोविडमुळे या चित्रपटाला बराच विलंब झाला असल्याने या चित्रपटाबाबत बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू होत्या. मात्र नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर प्रचंड चर्चेत आले आहे. या पोस्टरसह शाहिदने चित्रपटाच्या ट्रेलरची घोषणा केली आहे.
 
जर्सी पोस्टर
शाहिद कपूरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने जर्सीचे पोस्टर शेअर केले आहे. पोस्टरमध्ये शाहिद कपूरने क्रिकेटरचा गणवेश घातला असून मागून तो हातात बॅट धरलेला दिसत आहे. शाहिदच्या समोर एक मोठे मैदान दिसत आहे. या पोस्टरवर लिहिले आहे की, 'जर्सी'चा ट्रेलर उद्या म्हणजेच 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता रिलीज होणार आहे. शाहिदच्या चित्रपटाचे व्हायरल पोस्टर येथे पहा-
 
शाहिदसाठी खास...
हे पोस्टर शेअर करत लिहिले- 'वेळ आली आहे! हे शेअर करण्यासाठी आम्ही २ वर्षे वाट पाहिली. हे खरोखर खास आहे, ही टीम खास आहे... हे पात्र खास आहे. यासोबतच आम्ही तुमच्यासोबत मोठा स्क्रीन शेअर करणार आहोत, हे आमच्यासाठी खास आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मला आशा आहे की हे पात्र साकारताना मला काय वाटले ते तुम्हा सर्वांना वाटले असेल.  हा चित्रपट ३१ डिसेंबर २०२१ ला रिलीज होणार आहे.