शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 21 नोव्हेंबर 2021 (15:36 IST)

कंगना राणौतचा त्रास वाढला, शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी DSGMC ने सायबर सेलकडे केली तक्रार

दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीने (DSGMC) अभिनेत्री कंगना राणौतच्या विरोधात इंस्टाग्रामवर शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. समितीने जारी केलेल्या निवेदनानुसार रणौत यांच्याविरोधात मंदिर मार्ग पोलिस ठाण्यात सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
समितीचे म्हणणे आहे की, कंगनाने सोशल मीडियावरील तिच्या नुकत्याच केलेल्या पोस्टमध्ये जाणूनबुजून शेतकऱ्यांच्या निषेधाचे वर्णन 'खलिस्तानी चळवळ' असे केले आहे. "...कंगना हिने शीख समुदायाला खलिस्तानी दहशतवादी म्हणून संबोधले आणि (दिवंगत माजी पंतप्रधान) इंदिरा गांधी यांच्या सुनियोजित हालचाली म्हणून 1984 आणि त्यापूर्वीच्या नरसंहाराची आठवण करून दिली," असे निवेदनात म्हटले आहे.  
निवेदनात म्हटले आहे की, अभिनेत्रीने शीख समुदायाविरोधात आक्षेपार्ह आणि अपमानास्पद भाषा वापरली आहे. शीख समुदायाच्या भावना दुखावण्याच्या गुन्हेगारी हेतूने ही पोस्ट जाणूनबुजून तयार केली आणि शेअर केली गेली आहे, म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करतो की या तक्रारीची प्राधान्याने दखल घ्यावी आणि एफआयआर नोंदवून कठोर कायदेशीर कारवाई करावी.