गुरूवार, 14 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जून 2018 (10:41 IST)

प्रियंकाने मागितले 14 कोटी मानधन !

Priyanka sought 14 crores
सध्याच्या घडीला एक ग्लोबल आयकॉन म्हणून अभिनेत्री प्रियंका चोप्राची ओळख बनली आहे. विविध कार्यक्रम आणि आंतरराष्ट्रीय मनोरंजन विश्र्वात प्रियंकाचा असणारा वावर पाहता तिच्या चाहत्यांच्या संख्येतही दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.
 
गेल्या बर्‍याच वर्षांपासून परदेशातच वेळ घालवणारी प्रियंका चोप्रा पुन्हा एकदा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'जय गंगाजल' या चित्रपटानंतर सलमान खानची मुख्य भूमिका असणार्‍या 'भारत' या चित्रपटातून बॉलिवूडध्ये परतणार आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 'दबंग खान'सोबत या चित्रपटात झळकण्यासाठी तिने घसघशीत मानधन मागितले आहे. मनोरंजन विश्र्वात प्रियंकाचे असणारे सध्याचे स्थान पाहताच तिने मानधनाचा आकडा वाढवला असल्याची चर्चा आहे.
 
प्रियंकाने भारत या चित्रपटासाठी तब्बल 14 कोटी रुपयांच्या मानधनाची मागणी केल्याची चर्चा आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत सध्याच्या घडीला कलाकारांना मिळणार्‍या मानधनाच्या यादीत हा आकडा अनेकांच्या भुवया उंचावत आहे. आतापर्यंत सर्वाधिक मानधन घेणार्‍या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत दीपिकाचेनाव आघाडीवर होते. कारण, तिला 'पद्मावत'साठी 12 कोटींचे मानधन मिळाले होते. पण, प्रियंकाने आता भारतसाठी केलेली मानधनाची मागणी पाहता तिला हे मानधन जर देण्यात आले तर दीपिकापुढे ही प्रियंका सरस ठरेल.