रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 मे 2024 (00:30 IST)

Pushpa 2: अल्लू अर्जुन रोमान्स करताना दिसणार,दुसरे गाणे लवकरच रिलीज होणार

सुपरस्टार अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे. 'पुष्पा 2: द रुल'चे पहिले गाणे 'पुष्पा पुष्पा' रिलीज झाले आहे. या गाण्याला लोकांचे भरभरून प्रेम मिळाले. अल्लूचे चाहते या ट्रॅकवर रील बनवत आहेत. अल्लू अर्जुनने या गाण्यात केलेली डान्स स्टेप चांगलीच व्हायरल होत आहे.

पहिल्या गाण्याच्या यशानंतर आता दुसरे गाणे रिलीज करण्याची तयारी सुरू झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुसरे गाणे रोमँटिक असून या गाण्यात रश्मिका आणि अल्लू दोघेही दिसणार आहे. हे गाणे मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होणार असल्याची बातमी आहे.
 
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत या चित्रपटात फहद फाजील देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फहादचे चाहते त्याला शेखावतच्या भूमिकेत पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत. या तिघांशिवाय सुनील, अनसूया भारद्वाज, जगदीश आणि राव रमेश हेही चित्रपटात काम करत आहेत. 
 
सामंथा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. त्यांनी श्रीकांत विसासोबत चित्रपटाची कथा लिहिली आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू 'पुष्पा 2: द रुल' मध्ये कॅमिओ करताना दिसणार आहे. चित्रपटाचे संगीत देवी श्री प्रसाद यांनी दिले आहे.

Edited By- Priya Dixit