शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (18:43 IST)

अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 द रुलने पहिल्या दिवशी केली एवढी कमाई

Bollywood News: अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा 'पुष्पा 2 द रुल' चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. केवळ ॲडव्हान्स बुकींगद्वारे चित्रपटाने प्रचंड नफा कमावला. पहिल्या दिवसाच्या कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर, दुपारी 4 वाजेपर्यंत चित्रपटाने 71 कोटींचा आकडा पार केला होता. तसेच या चित्रपटाने भूल भुलैया 3, स्त्री 2 आणि सिंघम अगेनचे पहिल्या दिवशी कमाईचे रेकॉर्ड मोडले आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बॉक्स ऑफिसवर रिलीज होण्यापूर्वीच हा चित्रपट चर्चेत आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यापूर्वीच, आगाऊ बुकिंगद्वारे या चित्रपटाने 100 कोटी रुपयांच्या कमाईचा टप्पा ओलांडला आहे. तसेच पुष्पा 2 चे एकूण पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन भविष्यात कळेल. पण संध्याकाळी 4 वाजेपर्यंत चित्रपटाने 71.4 कोटींची कमाई केली. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.  

Edited By- Dhanashri Naik