बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 14 डिसेंबर 2020 (15:28 IST)

स्क्रीनवर आर माधवन रतन टाटाची भूमिका साकारणार आहे का? अभिनेताने सांगितले सत्य

टाटा कंपनीचे मालक रतन टाटा यांच्या जीवनावर आधारित बायोपिक येणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. त्यांच्या बोयोपिकमध्ये बॉलिवूड अभिनेता आर. माधव काम करणार असल्याचे सोशल मीडियावर बोललं जात आहे.

आर. माधवन आणि रतन टाटा यादोघांचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं जात आहे. आर. माधवन या बायोपिकमध्ये रतन टाटा यांची भूमिका साकारणार असल्याचाही दावा केला जात आहे.  यावर आर. माधवने एक ट्विट करुन याबद्दल खुलासा केला आहे.

असा कोणताही प्रकल्प पाइपलाइनमध्ये किंवा वाटाघाटीमध्ये नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एका चाहत्याने विचारले, माधवन, तू रतन टाटाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहेस हे खरं आहे का? जर तसे झाले तर बर्‍याच लोकांसाठी ती एक मोठी प्रेरणा असेल.

माधवन म्हणाला की, “दुर्दैवाने हे खरे नाही. माझ्या काही चाहत्यांची ही इच्छा आहे आणि म्हणून त्यांनी हे पोस्टर बनवले. असा कोणताही प्रोजेक्ट नाही किंवा त्यासंबंधी कोणतीही चर्चाही नाही”.

दरम्यान, आर. माधवनच्या या स्पष्टीकरणामुळे आता या चर्चेला पूर्णविराम लागला आहे. मात्र, बायोपिकमध्ये रतन टाट यांची भूमिका कोण साकारणार हे पाहण्यासाठी अनेकांना उत्सुकता लागली आहे.