शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. लोकप्रिय
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (16:36 IST)

रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ द्या, नेटकऱ्यांनी केली मागणी

टाटा ग्रुपचे अध्यक्ष रतन टाटा यांना ‘भारतरत्न’ द्या, अशी मागणी करणारी ऑनलाईन याचिका तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर या याचिकेला २ लाख ४० हजार लोकांनी पाठिंबा दर्शवला आहे. change.org या वेबसाईटच्या माध्यमातून ही याचिका करण्यात आली आहे. रतन टाटा हे मानवतेचे उत्तम उदाहरण आहेत. त्यामुळे त्यांना ‘भारतरत्न’ द्यावा अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
 
दरम्यान, रतन टाटा वेळोवेळी शैक्षणिक, सांस्कृतिक आणि संशोधनासाठी मदत करण्यासाठी नेहमी पुढे येतात. रतन टाटा यांनी ज्या संस्थांना मदत केली आहे त्या सर्व संस्थांची यादी तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टाटा ग्रुपच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजसेवेचीही माहिती यामध्ये देण्यात आली आहे. तथापि, कोरोना विषाणूविरुद्धच्या लढ्यासाठी टाटा ट्रस्ट आणि टाटा सन्सने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी याची घोषणा केली होती. टाटांनी निवेदन काढत, भारत आणि जगाची सध्याची परिस्थिती कमालीची चिंताजनक आहे. त्यावर त्वरीत कृती करणं गरजेचं आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा उद्योग समूह संकटाच्या काळात नेहमीच देशाच्या मदतीला धावून आला आहे, असं म्हटलं होतं.