Life after lockdown लॉकडाउन नंतर भारतीयांचे आयुष्य कसे असेल?

life after lockdown
नवीन रंगियाल| Last Modified शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (13:05 IST)
14 एप्रिल रोजी संपणाऱ्या 21 दिवसांच्या लॉकडाउनची मुदत वाढवून 3 मे पर्यंत करण्यात आली आहे. म्हणजे आपले जीव वाचविण्यासाठी घरी आणखी काही दिवस राहावे लागणार आहे. बहुतेक लोकं प्रतीक्षा करीत आहे ते म्हणजे लॉकडाउन संपल्यानंतर आपले आयुष्य कसे असणार.
1 ठराविक वेळेत उघडतील बाजार - लॉकडाउन संपल्यानंतर असे नाही की सर्व बाजारपेठ आणि शहरे एकत्र उघडतील आणि सर्वकाही पूर्वीसारखेच सामान्य होईल. काही सवलतीसह बाजारपेठ सुरू होतील. या सवलती दरम्यान, लोकांना बाहेर जाऊ देतील. या साठी शासनातर्फे मार्गदर्शक सूचना देण्यात येतील.

2 रेल्वेमधून प्रवास करणे सोपे नसणार - रेल्वेमधून प्रवास करण्यासाठी आपल्याला बऱ्याच नियमांचे पालन करावे लागणार आहे. पीटीआयच्या म्हणण्यानुसार एका मोठ्या अधिकाऱ्याने सांगितले आहे की रेल्वे सध्या उत्पन्नाचा विचार न करता प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करीत आहे. लॉकडाउन नंतर देखील सर्व प्रवासी तोंड बांधून असणार. अशी अपेक्षा बाळगतो.

3 तर रेल्वेने प्रवास करणे अशक्य - असे शक्य आहे की आरोग्य सेतू ऍपच्या साहाय्याने प्रवाशांची तपासणी केली जाईल. त्या तपासणीमध्ये कोणी प्रवाशी अस्वस्थ आढळल्यास त्याला प्रवासाची परवानगी दिली जाणार नाही.

4 थर्मल स्क्रीनिंग नंतर प्रवेश - विमानतळावर जसे प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग केले जाते. तश्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात प्रवाशांची थर्मल स्क्रीनिंग करणे अनिवार्य असणार.

5 हॉट-स्पॉट त्वरित कळेल - कोरोना पासून मुक्त झालेली शहरे तर ठीक आहे पण ज्या शहरांची नावे हॉट स्पॉट म्हणून नोंदल्या आहे त्यांचा वर जातीने लक्ष दिले जाणार आहेत. अश्या शहरांमधे ट्रेनचे आवागमनच रद्द करण्यात येईल किंवा अश्या हॉट स्पॉट शहरांसाठी तिकीटच मिळणार नाही.

6 हॉटेलमध्ये स्क्रीनिंग करावी - आपल्याला काही कारणास्तव गावी जावे लागले आणि त्या शहरात एखाद्या हॉटेलात राहण्याची वेळ आली तर थर्मल स्क्रीनिंग केले जाऊ शकते आणि त्यात आपणास तापाचे निष्पन्न झाल्यास आपल्याला हॉटेलमध्ये चेक इन करण्याची परवानगी मिळणार नाही.


7 आजारी असल्यास कोणीलाही भेटता येणार नाही - या पूर्वी आपण आजारी असल्यावर लोकं आपणास भेटावयास यायचे. पण सध्याची एकंदरीत परिस्थिती बघून या पुढे आपणांस भेटावयास कोणीही येणार नाही. आपले आप्तेष्ट मित्र मंडळ आणि नातेवाईक आता आपल्या तब्येतीची विचारपूस फक्त फोनवरच करतील.

8 समारंभ किंवा उत्सव साजरा करता येणार नाही - आतापर्यंत आपण समारंभात खूप एन्जॉय केले असणार पण आता असे करणे शक्य नसणार. 10 किंवा त्याहून अधिक लोकं एकत्र आल्यास आपल्याला तशी परवानगी घ्यावी लागेल किंवा समारंभात येणाऱ्यांची चौकशी किंवा तपासणी केली जाऊ शकेल.


यावर अधिक वाचा :

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा ...

ज्ञानवापी सर्वेक्षणावर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार, शिवलिंगाची जागा सील करून नमाज अदा सुरू ठेवण्याचे आदेश
ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला या ...

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक

विवाहितेवर दिवसाढवळ्या बलात्कार; दोघा भावांना अटक
मुंबई: अनोळखी क्रमांकावरून मिस कॉल आला. मिस कॉलवरून संवाद रंगला. पुढे फेसबुकवरून मैत्री ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित ...

कर्नाटकातील शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्याशी संबंधित मजकूर काढून टाकणे म्हणजे शहीदांचा अपमान : केजरीवाल
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी शालेय पुस्तकातून भगतसिंग यांच्यावरील ...

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून

माडसांगवीत पतीने केला पत्नीचा निघृण खून
नाशिक nashik शहरालगत असलेल्या माडसांगवी गावात भीषण प्रकार घडला आहे. संतापलेल्या पतीने ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर ...

शरद पवारांकडूनच राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा डाव? भाजपचा गंभीर आरोप
महाराष्ट्रात सध्या शरद पवार यांच्या मूक संमतीने सरकार पुरस्कृत दहशतवाद माजला असून ...

केतकी चितळेला आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलिस ...

केतकी चितळेला आता अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात ५ दिवसांची पोलिस कोठडी
वादग्रस्त अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

IPL 2022, RR vs CSK : राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर ...

IPL 2022, RR vs CSK : राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्जचा 5 गडी राखून पराभव केला
मुंबई. यशस्वी जैस्वालच्या 59 धावांच्या खेळीनंतर आर अश्विनच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर ...

ब्रँडेड नेकबँड केवळ ₹ 699 मध्ये 17 तासांसाठी लॉन्च केला ...

ब्रँडेड नेकबँड केवळ ₹ 699 मध्ये 17 तासांसाठी लॉन्च केला गेला, 10 मिनिटांच्या चार्जमध्ये 8 तास गाणी ऐकता येतील
तुम्ही दीर्घ बॅटरी लाइफ असलेला नेकबँड शोधत असाल, तर तुमचा शोध Zeb-Yoga 3 वर संपू शकतो. ...

मंगळ ग्रहावर आढळला दरवाजा, इथं खरंच परग्रहवासी राहतात का?

मंगळ ग्रहावर आढळला दरवाजा, इथं खरंच परग्रहवासी राहतात का?
अमेरिकेच्या नासा अंतराळ संस्थेकडून मंगळ ग्रहावर संशोधन करण्यासाठी एक 'क्युरोसिटी रोव्हर' ...

कोण आहेत ऋषी सुनक? ब्रिटनच्या 'संडे टाईम्स रिच लिस्ट'मध्ये ...

कोण आहेत ऋषी सुनक? ब्रिटनच्या 'संडे टाईम्स रिच लिस्ट'मध्ये ज्यांना स्थान मिळाले आहे
ब्रिटनचे अर्थमंत्री ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांच्या नावांचा वार्षिक ...