शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 एप्रिल 2020 (12:18 IST)

काय स्टॉक संपला ना???, सुबोध भावे विचारतोय

देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. अशात सर्वंच घरी बसले असून सोशल मीडियाद्वारे एकमेकांशी संवाद साधत आहेत तर दिवसभर काय केलं हे शेअर करत आहेत. अशात अभिनेता सुबोध भावेने नुकतंच ट्विट करत चाहत्यांना एक प्रश्न विचारला आहे. त्याने विचारले की ‘काय स्टॉक संपला ना’.
 
पण यात हैराण होण्याची किंवा दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही... कारण त्याने पुढे पोस्ट केलं आहे की गैरसमज नको. घरी असलेल्या पुस्तकांचा विचारतोय मी. कुठलं पुस्तक वाचताय?’ याचसोबत तो सध्या काय वाचतोय, हेसुद्धा त्याने सांगितलं. ‘मी सध्या अमिशचं रावण, शेषराव मोरे यांचे ‘मुस्लिम मनाचा शोध’ आणि ऋषिकेश गुप्ते यांचं नवीन आलेला संग्रह’, असं तो म्हणाला.