रविवार, 2 ऑक्टोबर 2022
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified गुरूवार, 16 एप्रिल 2020 (16:48 IST)

लॉकडाऊन हे पॉज बटण, समाधान नाही : राहुल गांधी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे पत्रकार परिषद घेऊन कोरोनाच्या संकटावर कशी मात केली पाहीजे, याबाबत आपली मते मांडली. ते म्हणाले की, “मी टिका करायची म्हणून माझे मत मांडत नाही आहे, तर यातून काही तरी चांगले घडावे, अशी माझी इच्छा आहे. मी गेल्या काही दिवसांपासून अनेक राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांनी चर्चा करत आहेत. त्यातून मला ज्या गोष्टी महत्त्वाच्या वाटल्या त्याबाबत मी सरकारला अवगत करु इच्छितो.”
 
कोरोना रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र लॉकडाऊन हे पॉज बटण आहे. ते समाधान नाही. व्हायरस पसरण्यापासून आपण फक्त थोड्या कालावधीसाठी पॉज करत आहोत. जेव्हा लॉकडाऊन उठवले जाईल. तेव्हा विषाणू पुन्हा पसरायला सुरुवात करेल. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायला हवे. तर आपल्याला आरोग्य सुविधा चांगल्या करायला हव्यात, असे राहुल गांधी यांनी सांगितले.
 
राहुल गांधी म्हणाले की, “कोरोना व्हायरसला हरविणारे सर्वात मोठे शस्त्र काय आहे? तर कोरोना टेस्टिंग करणे. आपण जास्तीत जास्त टेस्ट केल्या तर व्हायरस कुठून कुठे पसरत चाललाय हे कळू शकते. गेल्या काही दिवसांतील टेस्टची आकडेवारी पाहिले तर भारतातील सर्व जिल्ह्यांची सरासरी नुसार फक्त ३०० टेस्ट प्रति जिल्हा झालेल्या आहेत. जो पुरेसा नाही. सध्या आपण व्हायरस जिथे आढळतोय, तिथेच चाचण्या घेत आहोत. माझी मागणी आहे की, टेस्ट वाढवल्या पाहीजेत. रणनीती आखून टेस्ट वाढवल्या पाहीजेत.”
 
आपल्याकडे अन्नधान्याची कमतरता काही दिवसांनी येणार आहे. अर्थव्यवस्था कोसळणार आहे. छोट्या उद्योगांना उतरती कळा लागणार आहे. हे प्रश्न इतर कोरोनाग्रस्त राष्ट्रात नाहीत. त्यामुळे भारताला कोरोना संकटाचा सामना करताना या प्रश्नांचा देखील सामना करावा लागणार आहे. आज आपण कोरोनावर विजय मिळवला असे बोलू शकत नाही. आता कुठे ही लढाई सुरु झाली असून ही लढाई लांबपर्यंत चालणार असल्याचे राहुल गांधी म्हणाले.