मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 15 एप्रिल 2020 (10:45 IST)

WHO ने केली भारताच्या प्रयत्नांची प्रशंसा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 मे पर्यंत देशभरातील लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. याचं जागतिक आरोग्य संघटनेने कौतुक केलं आहे. WHO प्रमाणे भारत करोना विषाणूच्या विरोधात योग्य वेळेत आणि कठोर उपाययोजना करत आहे.
 
जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी म्हटले की आकड्यांच्या बाबतीत बोलणे घाईचे ठरेल परंतू करोनाचा मुकाबला करण्यासाठी सहा आठवड्यांचा देशव्यापी बंद मोठी गोष्ट आहे. 
 
सोशल डिस्टन्सिंग, आरोग्याच्या सर्वसुविधांची उपलब्धता, खबरदारीचे उपाय, करोनाबाधितांसाठी विलगीकरण कक्ष यामुळे करोना विषाणूचा प्रसार रोखण्यात भारताला मोठ्या प्रमाणात यश येताना दिसते आहे. अनेक आव्हाने आणि संकटे समोर असताना भारताचे खूप चांगल्या पद्धतीने करोनाच्या महासंकटाचा मुकाबला केला आहे, असे त्या म्हणाल्या.