रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2020 (12:24 IST)

इसाबेलला लाँच करणार सलमान

सलमान-कतरिना यांच्या अफेअरची चर्चा विशेष रंगली होती. 2005 मध्ये मैंने प्यार क्यों किया चित्रपटातून कतरिनाने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. आता कतरिनाला सुमारे 15 वर्षे झाली असून ती आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. आता कतरिनापाठोपाठ तिची धाकटी बहीण इसाबेल कैफदेखील फॅन फॉलोइंग मिळवत आहे. इसाबेलने माशा-अल्लाह या गाण्यातून  चित्रपटसृष्टीत प्रवेश केला आहे.
 
इसाबेलचे हे गाणे नुकतेच रिलीज झाले असून त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूडमध्ये कतरिनाला लाँच करणार सलमाननेदेखील इसाबेलचे हे गाणे सोशल मीडियावर पोस्ट करत तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सलमानने केलेले इसाबेलचे कौतुक बघता कतरिनाप्रमाणेच सलमान इसाबेललादेखील लाँच करेल, अशी शक्यता  नाकारता येणार नाही. नवीन अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लाँच करण्याबद्दल सांगायचे झाल्यास भाग्यश्री, नगमा, रविना टंडन, आयशा जुल्का, रेवती यासारख्या नामांकित अभिनेत्रींनादेखील सलमाननेच लाँच केले होते. त्यानंतर सलमाननेच लाँच केलेल्या कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, डेझी शाह, झरीन खान या बॉलिवूडवर अधिराज्य करत आहेत.