शनिवार, 1 ऑक्टोबर 2022
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified शनिवार, 16 ऑक्टोबर 2021 (12:06 IST)

राज आणि शिल्पा कुंद्राच्या अडचणीत वाढ : शर्लिन चोप्राने गंभीर आरोप करत, तक्रार दाखल केली

सध्या अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा हे पोर्नोग्राफीच्या प्रकरणात तुरुंगात आहे. शर्लिन चोप्रा सातत्याने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला लक्ष्य करत आहे. पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राचे नाव पुढे आल्यानंतर शर्लिनने सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आणि राजवर या रॅकेटमध्ये सामील असल्याचा आरोप केला. आता तिने राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याविरोधात फसवणूक आणि मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
 
शर्लिनने 14 ऑक्टोबर रोजी ही तक्रार दाखल केली. माध्यमांशी बोलताना ती म्हणाली की, 'मी राज कुंद्राविरोधात लैंगिक छळ, फसवणूक आणि धमक्या दिल्याची तक्रार केली आहे.' 
 
शर्लिन चोप्रा पुढे म्हणाली की 'त्याने अंडरवर्ल्डची धमकी दिली. आपण नीट लक्षात असू द्या,की तुम्ही माझ्यावर लैंगिक अत्याचार केले. मुलींना त्यांचे शरीर दाखवायला बाध्य केले, तुम्ही त्यांचे पैसे का देत नाही? तुम्ही त्यांची फसवणूक का करता? ते कलाकाराच्या घरी जातात आणि त्याला अंडरवर्ल्डची धमकी देतात. ते म्हणतात लैंगिक अत्याचाराचे प्रकरण मागे घ्या अन्यथा तुमचे आयुष्य उध्वस्त होईल.ती पुढे म्हणते, 'त्यांनी मला धमकावले आणि अनेक धमक्या दिल्या. मी एकटी महिला आहे. मला एकटे राहण्याची भीती वाटते. आज मी हिमतीने पुन्हा समोर आले. 
 
शर्लिनने सांगितले की, 27 मार्च 2019 रोजी राज कुंद्रा रात्री उशिरा तिच्या घरी आले  आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कुंद्राच्या दबावाखाली तिने  29 मार्चला फोटोशूट केले.