रविवार, 15 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 मार्च 2024 (12:45 IST)

Randeep Hooda: स्वातंत्र्यवीर सावरकर'साठी अभिनेत्याचं रूपांतर

Randeep Hooda
'हायवे', 'सुलतान' आणि 'सरबजीत' यांसारख्या अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाने इंडस्ट्रीत छाप पाडणारा अभिनेता रणदीप हुड्डा सध्या दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पणामुळे चर्चेत आहे. 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या चित्रपटात अभिनेत्याने अभिनय आणि दिग्दर्शनही केले आहे. या चित्रपटात तो स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे, ज्यामध्ये वीर सावरकरांच्या भूमिकेतील रणदीप हुड्डा लोकांना आवडला आहे. या भूमिकेसाठी त्याने केलेले परिवर्तन रसिकांना खूप  आवडत आहे. रणदीपने चित्रपटाच्या प्रत्येक दृश्यात सावरकरांची झलक उत्तम प्रकारे दाखवली आहे. रणदीपने हे पात्र साकारले नसून ते जगले आहे, ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 
 
अलीकडेच रणदीप हुड्डाने त्याच्या सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याचा लूक लोकांना आश्चर्यचकित करत आहे. चित्रात रणदीप हुड्डाचं रूपांतर तुम्ही पाहू शकता. वीर सावरकरांच्या भूमिकेसाठी रणदीप हुडाचे वजन कसे कमी झाले. या फोटोत रणदीपला ओळखणे कठीण होत आहे. त्याचे हे रूपांतर पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.फोटो शेअर करताना रणदीप ने 'ब्लॅक वॉटर' असे कॅप्शन लिहिले आहे. कालापानीच्या शिक्षे दरम्यान सावरकर अत्यंत बारीक झाले होते. असे रणदीपच्या नवीन लूक  वरून दिसत आहे. रणदीपने स्वतःचा लूक बदलला आहे. सध्या रणदीपचा हा नवीन लूक आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. चित्रपटासाठी त्याच्या समर्पणासाठी त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हा चित्रपट 22 मार्च 2024 हिंदी आणि मराठी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 
 
Edited by - Priya Dixit