शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 22 ऑक्टोबर 2023 (16:35 IST)

दुर्गा पंडालमध्ये चप्पल घालून गेलेल्या राणी मुखर्जीला ट्रोल केले

Rani Mukherjee
सध्या देशभरात नवरात्री साजरी होत आहे आणि बॉलीवूड स्टार्सही ते साजरे करण्यात मागे नाहीत. दुर्गा सप्तमीनिमित्त अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी दुर्गा पंडालमध्ये माँ दुर्गाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचले.त्यात काजोल, राणी, सुश्मिता आहे. 
 
यावेळी राणी मुखर्जी तिच्या एका कृतीमुळे ट्रोल होत आहे.दरवर्षी दुर्गापूजेसाठी बंगाली अभिनेत्र्यांचा दुर्गा पंडाल मध्ये जमावडा असतो. या वेळी राणी मुखर्जी दरवर्षी प्रमाणे पोहोचली आणि तिने केली एक चूक तिला चांगलीच भोवली आहे. राणी दुर्गा पूजेच्या पंडाल मध्ये चप्पल घालून फिरताना दिसली. राणीचे असे वागले नेटकऱ्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी राणीला ट्रोल करायला सुरु केले. नेटकरी तिच्यावर टीका करत आहे. एकाने लिहिले की हे भक्ती करायला आले नाही तर फॅशन शो मध्ये आले आहे. दुसर्‍या व्यक्तीने लिहिले, "दुर्गा माँच्या मंचावर चप्पल????" यावेळी राणी मुखर्जी अतिशय सुंदर गोल्डन कलरच्या साडीत दिसली. ती तिच्या मित्र-मैत्रिणीशी, नातेवाईकांशी बोलताना दिसली. 
 
 
 














Edited by - Priya Dixit