रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 25 जानेवारी 2022 (15:09 IST)

रश्मिका मंधानाची महागडी साडी, किमत जाणून घ्या

फोटो साभार- इंस्टाग्राम 
पुष्पा या चित्रपटामुळे चर्चेत आलेली दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून लोकप्रिय आहे. पुष्पा चित्रपटात वल्लीची भूमिका साकारणारी रश्मिका मंधानाचा सोशल मीडियावर साडीतला फोटो व्हायरल झाला होता. हा फोटो रश्मिकाने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केला आहे.  या फोटोत तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे. ही साडी लुना साडी म्हणून ओळखली जाते. ही साडी रश्मिका ने हैद्राबाद मध्ये पुष्पा चित्रपटाच्या एका प्रमोशनसाठी नेसली होती. ही साडी अंकिता जैन ने डिझाईन केली असून त्या साडीची किंमत 31 हजार 500 रुपये आहे. अंकिता हॅन्ड क्राफ़्टेड ऑफ व्हाईट ऑर्गेंझा डिझाइनर आहे. ही साडी महागडी साडी म्हणून चर्चेत आली आहे. रश्मिका ही सोशल मीडियावर एक्टीव्ह असून तिने या साडीतील फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर शेअर केले आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंधाना पुष्पा चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.हा चित्रपट लाल चंदनाच्या तस्करीवर आधारित असून 17 डिसेंबर रोजी चित्रपट गृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे.