बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 11 नोव्हेंबर 2017 (16:46 IST)

न्यूड साठी परवानगी नाही

यामध्ये सर्वात महत्वाचा असा प्रसिद्ध दिग्दर्शन  रवि जाधव यांचा  'न्यूड' या सिनेमाला 48 व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमधून (इफ्फी)  ऐनवेळी काढण्यात आले आहे. या अगोदर या चित्रपटास  तेरा ज्युरी मेबर्सनी एकुण 24 सिनेमांची इंडियन पॅनोरमा विभागासाठी निवड करण्यात आली होती. यामध्ये ठरल्या प्रमाणे  पॅनारोम विभागात न्यूड सिनेमाचं स्क्रीनिंग होणार हे निश्चित होते ,मात्र माहिती व प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या यादीतून या सिनेमाला अचानक  वगळण्यात आलं. सिनेमाचे नाव न्यूड असे आहे त्यामुळे हा निर्णय घेतला असा कयास लावला जात आहे. यात एक विशेष की हा निर्णय ज्युरी मेंबर्सचा सल्ला न घेता लादण्यात आला आहे.  अपूर्वा असराणी यांनी केंद्राच्या या निर्णयावर मोठ्या प्रमाणत  नाराजी व्यक्त केली आहे.हा सिनेमा पाहण्याची सर्वांची इच्छा होती याला विरोध होता मग आधीच सांगायचे होते , मी  फेडरेशनकडे  लेखी नाराजी व्यक्त केली आहे, असं अपूर्वा असणारी यांनी म्हंटलं आहे.