मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 नोव्हेंबर 2021 (17:08 IST)

2 कोटींहून अधिक फी घेणारा शाहरुख खानचा बॉडीगार्ड रवी आता आर्यन खानची सुरक्षा करणार

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान गेल्या महिन्यात मुंबईत क्रूझवर एका कथित ड्रग पार्टीत पकडला गेला होता. मात्र, आर्यन खान आता जामिनावर बाहेर आला आहे. या घटनेनंतर शाहरुख खानला आपल्या मुलाची खूप काळजी वाटू लागली असून तो त्याच्यासाठी नवीन बॉडीगार्डच्या शोधात असल्याची बातमी येत होती. तर सूत्रांप्रमाणे त्याचा विश्वासू रवी सिंग त्याचा मुलगा आर्यन खानसोबत असेल.
 
शाहरुख खान आणि गौरी खान त्यांचा मुलगा आर्यन खानसाठी बॉडीगार्ड शोधत असल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आल्यापासून मुंबईतील सुरक्षा कंपन्यांनी खूप रस दाखवला आहे. चित्रपट उद्योगातील सूत्राने सांगितले की डझनभर सुरक्षा कंपन्या आणि खाजगी अंगरक्षकांनी नोकरीसाठी शाहरुख खानच्या रेड चिलीज कार्यालयात त्यांचे अर्ज पाठवले आहेत. सेलिब्रेटी आणि नाइटक्लबची सुरक्षा हाताळण्याचा या लोकांना अनेक वर्षांचा अनुभव आहे.
 
आर्यन खान किंवा शाहरुख खानसाठी नवीन अंगरक्षक नेमले जातील की नाही याची पुष्टी स्त्रोताने केलेली नाही, परंतु त्यांनी उघड केले की अद्याप कोणत्याही अर्जाला प्रतिसाद मिळालेला नाही. 
 
बॉडीगार्ड रवी सिंग हे शाहरुख खानसोबत दीर्घकाळापासून आहेत आणि ते त्यांच्या कुटुंबाचा एक भाग मानले जातात. शाहरुखचा बॉडीगार्ड रवी त्याच्यासोबत गेली अनेक वर्ष आहे. रवीने आजवर शाहरुखची सुरक्षा केली. आर्यन जेव्हा जेव्हा एनसीबी कार्यालयात गेला आहे तेव्हा रवी त्याच्यासोबतही सावलीप्रमाणे राहिला आहे. याच विश्वासामुळे शाहरुखने त्याची नेमणूक आर्यनचा बॉडीगार्ड म्हणून केली आहे. शाहरुख स्वतःसाठी दुसऱ्या बॉडीगार्डची नेमणूक करणार आहे.