मंगळवार, 7 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 18 फेब्रुवारी 2024 (10:17 IST)

अभिनेत्री रवीना टंडन चे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी टंडन यांचा मुंबई महानगरपालिकेकडून अनोखा सन्मान

Raveena tandon
बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनचे वडील आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते रवी टंडन यांचा मुंबई महानगरपालिकेकडून अनोखा सन्मान करण्यात आला आहे. रवीना टंडनने स्वत: याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी ती भावूक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
 
मुंबईतील जुहू परिसरातील चौकाचे अनावर
रवी टंडन यांच्या भारतीय चित्रपट उद्योगातील महत्त्वपूर्ण योगदानाची दखल मुंबई महापालिकेने घेतली आहे. मुंबईतील जुहू परिसरातील एका चौकाला रवी टंडन यांचे नाव देण्यात आले आहे. रवीना टंडनने इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यातील एका फोटोत मुंबईतील जुहू परिसरातील चौकाजवळ लावलेले फलक दिसत आहे. या फलकावर 'निर्माता श्री रवि टंडन चौक' असे लिहिण्यात आले आहे. यावर 'मुंबई महापालिका' असेही नमूद करण्यात आले आहे.
 
याचा एक व्हिडीओही तिने शेअर केला आहे. यात रवीनाची आई विणा आणि रवीना या दोघीही रवी टंडन चौक या बोर्डाचे अनावर करताना दिसत आहेत. या व्हिडीओला तिने हटके कॅप्शन दिलं आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पप्पा. आम्हाला तुमची रोज आठवण येते, असे म्हटले आहे.

Edited By -Ratnadeep Ranshoor