बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र गप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 17 फेब्रुवारी 2024 (12:54 IST)

दगडी चाळ फेम अभिनेत्री पूजा सावंत ने उरकला साखरपुडा

pooja sawant
Photo- Instagram
अभिनेत्री पूजा सावंत ने सिद्धेश चव्हाणशी गुपचूप साखरपुडा केला आहे. सिद्धेश चव्हाण हा कामानिमित्त ऑस्ट्रेलियाला आहे. दगडी चाळ फेम  अभिनेत्री पूजा सावंत हिच्या लग्नाची सध्या चर्चा सुरु आहे. ती सिद्धेश चव्हाणशी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात लग्न करण्याच्या चर्चा सुरु होत्या. आता तिने गुपचूप साखरपुडा केल्याचा बातम्यां चर्चेत आहे. 
 
अभिनेत्रीने साखरपुड्यासाठी हिरवी रंगाची पैठणी साडी, नाकात नथ आणि भरजरी हार घातलेला लूक केला असून या पारंपरीक लूक मध्ये ती छान दिसत होती. तर सिद्धेश याने ऑफ व्हाईट रंगाचा सदरा  घातला होता. त्यांनी साखरपुड्याच्या दरम्यान मीडियासमोर एकत्र येऊन चाहत्यांना धक्काच दिला. 
अभिनेत्रीने काही दिवसांपूर्वी सिद्धेशच्या सोबत रिलेशनशिप मध्ये असल्याचे सांगितले होते. तेव्हा पासून चाह्त्ये लग्न कधी करणार असे विचारत होते. आता तिने गुपचूप साखरपुडा उरकून चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 

Edited by - Priya Dixit