सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 जुलै 2022 (13:44 IST)

रिया चक्रवर्ती देत होती सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज- एनसीबी

एनसीबीनं सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्तीवर चार्जशीट दाखल केलीय. त्यात रिया चक्रवर्तीच सुशांतसिंह राजपुतला ड्रग्जचा पुरवठा करत होती, असा आरोप ठेवण्यात आलाय.
 
चार्जशीटमध्ये रिया सुशांतसाठी ड्रग्ज विकत घ्यायची आणि त्याला द्यायची, असं म्हटलं आहे.
 
14 जून 2020 रोजी सुशांतसिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या अपार्टमेंटमध्ये आढळून आला होता.
 
'हे आत्महत्येचं प्रकरण आहे. पोलीस तपास करत आहेत. पण कुठलीही सुसाईड नोट मिळालेली नाही,' असं तेव्हा मुंबई पोलिसांचे प्रवक्ते प्रणय आशोक यांनी सांगितलं होतं.
 
त्यानंतर 8 सप्टेबर 2020 रोजी पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त करणे आणि इतर कलमांखाली रिया चक्रवर्तीला अटक केली होती. त्यानंतर 7 ऑक्टोबर 2020 रोजी तिला जमीन मिळाला होता.
 
एनसीबीच्या चार्जशीटनुसार रिया तिचा भाऊ शौविक, सॅम्युएल मिरांडा, दिपेश सावंत आणि इतरांकडून मॅरुआनाची डिलिव्हरी घेत होती. त्याचे पैसेसुद्धा तिनेच दिले होते.
 
"रिया माझ्या मुलाला बऱ्याच काळापासून विष देत होती. ती खुनी आहे. तपासयंत्रणांनी तिला आणि तिच्या सहकाऱ्यांना अटक करायला हवी," असा आरोप सुशांतचे वडील के. के. सिंह यांनी केला होता.