मालेगावमध्ये २४ लाखाचा गांजा जप्त; दोघांना अटक
मालेगाव तालूक्यातील मोहपाडे-अस्ताने रस्त्यावरील मोहपाडे शिवारातील एका शेतातील खोलीत छापा मारत जवळपास २४ लाखाचा पवणे पाचशे किलो गांजा जप्त केला. शहरातील एका गुन्हाचा शोध घेत असतांना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.
प्लास्टिकच्या १७ गोणीमध्ये गांजाचे चौकणी ठोकळ्यांमध्ये तो बांधण्यात आलेला होता. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मुख्य संशयित अस्लम गांजावाल हा मात्र फरार झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मालेगाव तालूक्यात गांजाची साठवणूक व नंतर विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे.