मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 7 जून 2022 (18:13 IST)

माजी क्रिकेटपटू नमन ओझाच्या वडिलांना अटक, बॅंकेत 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप

arrest
माजी भारतीय क्रिकेटपटू नमन ओझाचे वडील व्हीके ओझा यांना मुलताई पोलिसांनी सोमवारी अटक केली. नमनच्या वडिलांवर बँक मॅनेजर असताना 1.25 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. मुलताई पोलिसांनी व्ही.के.ओझा यांना सोमवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी नमन ओझा हाही पोलिस ठाण्यात हजर होता. त्याने वडिलांना जामीन मिळवून देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना जामीन मिळाला नाही.
 
प्रत्यक्षात बँक ऑफ महाराष्ट्रच्या जौलखेडा शाखेत 2013 मध्ये सुमारे 1.25 कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी 2014 मध्ये तत्कालीन व्यवस्थापक नमनच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच्यावर फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
 
नमन ओझा हा भारताचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत एक कसोटी, एक वनडे आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय नमनने 113 आयपीएल सामनेही खेळले आहेत. नमनच्या कसोटीत 56 धावा, एकदिवसीय सामन्यात एक धाव आणि T20 मध्ये 12 धावा आहेत.
 
नमनने आयपीएलमध्ये  1554  धावा केल्या आहेत. नमनचा जन्म 20 जुलै 1983 (वय 38) रोजी उज्जैन येथे झाला. नमनने 2021 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.