रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (10:52 IST)

झाडाला लटकलेला आढळला तरुण जोडप्याचा मृतदेह

राज्यात पालघर येथे वारखंडा गावात एका जोडप्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला आहे. मृत तरुणाचे वय 23 वर्षे तर महिलेचे वय 21 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना पालघर जिल्ह्यातील वरखंडा गावातील आहे. आर्थिक अडचणीमुळे या दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचे पोलिसांनी सांगितले. तलासरी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, सुष्मिता प्रकाश भीमरा आणि सुदीप धाकू उंबरसदा यांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही लग्न करणार होते. मात्र या जोडप्याला आर्थिक समस्येला सामोरी जावे लागत होते. हा तरुण सलून चालवायचा पण त्याचे सलून कोरोनामुळे बंद झाले. या मुळे आर्थिक दुर्बळतेला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल घेतले. पोलिसांनी प्रकरण नोंदवले आहे.