1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (10:10 IST)

'असले न्यायाधीश त्या जागेवरून संपवले पाहिजेत...' संभाजी भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य

लिव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नाही, असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवलं पाहिजे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे प्रमुख संभाजी भिडेंनी केलंय.
 
मी हे बोलल्याने गुन्हे दाखल होतील, काय गुन्हे दाखल करायचे ते करू देत, असंही त्यांनी म्हटलंय.
 
राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर संभाजी भिडेंनी सांगलीत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी भिडे बोलत होते.

"लिव्ह इन रिलेशनशिप हा काय बेशरमपणा आहे. कसलं लिव्ह इन रिलेशनशिप? लिव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नाही असं म्हणणारी न्यायालयेदेखील वध्य आहेत. असले न्यायाधीश त्या जागेवरून संपवले पाहिजेत.
 
"मी बोलतोय त्याचा मला चटका बसेल. माझ्यावर गुन्हे दाखल होतील. काय गुन्हे दाखल करायचेत ते करूदेत," असं या पत्रकार परिषदेत बोलताना संभाजी भिडे म्हणाले.