1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जानेवारी 2022 (08:45 IST)

इगतपुरीत गँगवारचा भडका, दोन गटात तुफान हाणामारी, एकाचा मृत्यू

Gangwar erupts in Igatpuri
नाशिक जिल्ह्यातील पर्यटन नगरी इगतपुरीत गँगवार सुरु झाली आहे. यात पूर्ववैमनस्यातून एकाचा खून तर एक जण गंभीर जखमी झालाय. शुक्रवारी  सकाळी दोनगटात तुफान राडा झाल्याने इगतपुरी चे नागरिक दहशतीखाली आहेत. ग्रामीण पोलिसांनी राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या दाखल केल्या आहेत . सध्या शहरात संचारबंदी लागू करण्यात आलीय तर शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आलीय.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या घटनेमुळे गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच बाजारपेठ बंद करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी अद्याप कुणाला अटक करण्यात आल्याची माहिती समोर आलेली नाही. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गावात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना कोरोना संकट काळात आर्थिक संकटासह अनेक संकटांना समोरं जावं लागलं. त्यात आता आणखी या गुंडांच्या हैदोसाने त्यांच्यावर दुकानं बंद ठेवण्याची नामुष्की आली आहे.