गुरूवार, 2 फेब्रुवारी 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified बुधवार, 28 जुलै 2021 (14:53 IST)

लसी घेण्यावरून दोन गटात हाणामारी;12 जण जखमी

कोरोनाचा वेग जरी मंदावला असेल तरी ही काही राज्यात कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहे.या वर लसीकरण ही उपाय आहे.सध्या काही राज्यात कोरोनाच्या लसींचा तुटवडा आहे.या मुळे काही राज्यात लसीकरणाचा वेग मंदावला आहे.अशा परिस्थितीत काही लसीकरण केंद्रे बंद ठेवावे लागत आहे.अद्याप काही लोकांना लसीचा पहिला डोस देखील मिळाला नाही.त्यामुळे लसी उपलब्ध झाल्यावर नागरिकांची गर्दी लसीकरण केंद्रावर बघायला मिळत आहे.लसी मिळवून घेण्यासाठी लोकांमध्ये हाणामारी देखील होत आहे.
 
असेच काहीसे बघायला मिळाले ते बिहारच्या सीतामढी खेड्यातील भटोलियाते या गावातील माध्यमिक शाळेत लसीकरणाचे काम सुरु आहे.दरम्यान,मंगळवारी या लसीकरण केंद्रात दोन गटात हाणामारी झाली.प्रथम लसी घेण्याच्या गोष्टीवरून वाद सुरु झाला नंतर त्याचे रूपांतरण हाणामारीत झाले.या हाणामारीत बऱ्याच लोकांना दुखापत झाली आहे.घटनेची माहिती मिळतातच पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.या हाणामारीत सुमारे 12 जण जखमी झाले आहेत.
 
पोलिसांनी ताबडतोब पोहोचून परिस्थितीला नियंत्रणात आणले सध्या गावात काही अनुचित प्रकार घडू नये या साठी  काही पोलीस कर्मचाऱ्यांना तैनात केले आहे. त्यामुळे गावात शांतता आहे.या हाणामारीत काही लोकांनी दगडफेक करायला सुरु केले त्यामुळे काही लोक गंभीररित्या जखमी झाले आहेत. तर काही किरकोळ जखमी झाले आहे.सध्या परिस्थिती आटोक्यात आहे.