शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 28 जुलै 2021 (13:54 IST)

14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल

सध्या कोरोनाची प्रकरणे कमी येत आहे.त्यामुळे राज्यातील उद्योजकता वाढविण्या वर भर देण्याच्या आदेशाला अनुसरून कोरोनाची प्रकरणे कमी असलेल्या 14 जिल्ह्यात निर्बंध शिथिल करण्याचे प्रस्ताव आरोग्यविभागाकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्याचा विचार करत आहे.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ज्या जिल्ह्यात कोरोनाची प्रकरणे कमी असल्यास तर त्या जिल्ह्यात निर्बंध कमी करण्याच्या प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना सादर केला जाणार असे सांगितले होते. राज्यातील एकूण 35 जिल्ह्यांपैकी ज्या 14 ठिकाणी कोरोनाची प्रकरणे कमी आहेत अशा जिल्ह्याची एक स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे.
 
उद्योग व्यापारासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यासाठी आणि उद्योग-व्यापाराना चालना मिळण्यासाठी या ठिकाणचे निर्बंध शिथिल केले जातील.ज्या ठिकाणी कोरोना सक्रिय रुग्णदर एक किंवा त्यापेक्षा कमी असेल. 
 
पूरग्रस्त कोल्हापूर,सातारा,सांगली,या जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती आरोग्य विभागाला वाटत आहे.त्यामुळे या ठिकाणी कोरोना वाढू नये त्यासाठी उपाययोजना कशा प्रकारे करावे केले जातील या कडे देखील आरोग्य विभाग लक्ष देत आहे.