नागपूरची कोरोनामुक्तीकडे वाटचाल, पहिल्यांदा बाधितांच्या आकड्यात तीनपर्यंत घट
नागपुरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत रुग्णसंख्या कमी वेगानं वाढली. मात्र दुस-या दुस-या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या झपाट्यानं वाढली.दुस-या लाटेत तर कोरोनाबाधितांचा आकडा दिवसाला आठ हजारांपर्यंत पोहचला होता. मात्र जूनपासून नागपुरात कोरोना नियंत्रणात येत आहे.नागपुरात रविवारी तर केवळ 3 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. 22 मे 2020 ला नागपुरात तीन कोरोनाबाधित आले होते. त्यानंतर पहिल्यांदा बाधितांच्या आकड्यात तीनपर्यंत घट झाली आहे.
नागपुरात 11 मार्च 2020 ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर सुरुवातील बाधितांची संख्या हळहळू वाढत होती. 3 मे 2020 ला 3 कोरोनाबाधित आढळले होते. मात्र त्यानंतर कोरोनाबाधितांचा वेग झपाट्यानं वाढला. दुस-या लाटेत कोरोनाने कहर घातला.बाधितांचा आकडा 8 हजारापर्यंत पोहचला होता. हजारो बळी कोरोनानं घेतलेत.आता जुनपासून कोरोनाची स्थिती आटोक्यात येवू लागली. त्यानंतर गेल्या 14 महिन्यांच्या कालावधीनंतर कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला असून रविवारी केवळ 3 बाधितांची नोंद जिल्ह्यात झाली. दिवसभरात 20 जण बरे होऊन घरीही परतलेत. रविवारला शहरात 6189 व ग्रामीणमध्ये 1182 अशा जिल्ह्यात 7351 चाचण्या करण्यात आल्यात. त्यापैकी केवळ 3 जणांचे अहवाल सकारात्मक आढळून आले. नागपूर शहरात सलग दुसर्याही दिवशी 2 तर ग्रामीणमध्ये एका बाधिताची नोंद करण्यात आली.
नागपूर एकूण कोरोनामुक्तांची संख्या 4 लाख 82 हजार 474 वर गेली असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.90 टक्क्यांवर पोहचले आहे. शहरात 176 ,ग्रामीणमध्ये 46 व जिल्ह्याबाहेरील 5 असे केवळ 227 सक्रिय (अँक्टिव्ह) रुग्ण आहेत.तर सलग नवव्याही दिवशी शून्य कोरोनाबळीची नोंद करण्यात आली.