सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 26 जुलै 2021 (08:25 IST)

राज्यात 6,843 नवे रुग्ण;5,212 जणांना डिस्चार्ज

राज्यात रविवारी  6 हजार 843 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर,5 हजार 212 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी 60 लाख 35 हजार 029 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
 
आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 62 लाख 64 हजार 922 एवढी झाली आहे.महाराष्ट्रात सध्या 94 हजार 985 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. महाराष्ट्रात 123 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.राज्यात आजवर 1 लाख 31 हजार 555 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत.राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.09 टक्के एवढा झाला आहे.रिकव्हरी रेट 96.33 टक्क्यांवर पोहोचला आहे.
राज्यात आतापर्यंत 4 कोटी 68 लाख 46 हजार 984 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 17 हजार 362 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 506 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.