शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (12:06 IST)

निर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट कोसळली,5 ठार

मुंबईतील वरळीत निर्माणाधीन इमारतीतील बांधकाम लिफ्ट कोसळली आहे. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 पेक्षा अधिक जखमी झाले आहेत मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य सुरु केलं आहे. 
 
वरळीतील अंबिका बिल्डर्स शंकरराव पदपथ रोड118 व 119 बीडीडी चाळ, हनुमान गल्लीत हा अपघात झाला.या निर्माणाधीन इमारतीत काही काम सुरु होतं. या दरम्यान ही लिफ्ट कोसळली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना केएम आणि नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
अविनाश दास वय वर्षे 35 ,भारत मंडळ 27 वर्ष,चिन्मय मंडळ 33 वर्ष ,लक्ष्मण मंडळ 35 वर्ष,आणि 45 वर्षीय एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे ,आणखी एका व्यक्ती ची ओळख पटली नाही.