1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: शुक्रवार, 23 जुलै 2021 (19:55 IST)

परमबीर सिंग यांच्यावर दोन कोटींच्या खंडणीचा आणखी एक गुन्हा

Another Rs 2 crore ransom case against Parambir Singh Maharashtra news Regional Marathi News In  marathi Webdunia Martahi
मुंबई आणि ठाणे शहराचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंदवण्यात आला आहे.सिंग यांनी शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. ठाणे शहरातील कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शरद अग्रवाल नावाच्या व्यक्तीकडून दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी परमवीर सिंग यांच्याविरुद्ध कलम ३८४, ३८५, ३८८, ३८९, ४२०, ३६४ ए, ३४, १२० बी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परमबीर सिंग व्यतिरिक्त संजय पुनमिया, सुनील जैन, मनोज घोटकर आणि मनेरे यांचीही नावे आहेत. परमबीर सिंग हे ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना मनारे हे त्यावेळी ठाण्याचे गुन्हे शाखेचे डीसीपी होते.

याआधी, परमबीर सिंह,डीसीपी अकबर पठाण यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कालच गुन्हा दाखल करण्यात आला होता. बिल्डर श्याम सुंदर अगरवाल यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. केस मागे घेण्यासाठी आपल्याकडे खंडणी मागितल्याचा दावा अगरवाल यांनी केला आहे.त्यानंतर परमबीर सिंग यांच्यासह सहा जणांवर खंडणी आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला.मुंबईतील मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे दोघे परमबीर यांच्यासाठी खंडणी उकळायचे, असा आरोप आहे.