सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मुंबई
Written By
Last Modified: रविवार, 25 जुलै 2021 (10:46 IST)

मुंबईत लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू,आदित्य ठाकरे यांच्याकडून अपघाताची पाहणी

मुंबईच्या वरळी भागात एका इमारतीतील लिफ्ट कोसळून 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
वरळीतील हनुमान गल्लीतील ललित अंबिका या इमारतीत ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे.या इमारतीत कार पार्किंगसाठी वापरण्यात येणाऱ्या लिफ्ट शाफ्टमध्ये हा अपघात झाला. त्याठिकाणी काही काम सुरू होतं. पण त्याच दरम्यान अचानक नवव्या मजल्यावरून लिफ्ट खाली कोसळली.अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाचं बचावपथक याठिकाणी दाखल झालं.
 
मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली तसंच घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.