रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 27 जुलै 2021 (08:28 IST)

दिलासादायक ! तब्बल पाच महिन्यांनंतर पाच हजारांहून कमी रुग्ण

राज्यात सोमवारी तब्बल पाच महिन्यांनंतर पाच हजारांहून कमी कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी  4 हजार 877 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली तर,53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
 
आरोग्य विभागाच्या हवाल्याने एएनआय’ने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 62 लाख 69 हजार 799 एवढी झाली आहे. त्यापैकी 60 लाख 46 हजार 106 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 11 हजार 077 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. महाराष्ट्रातील सक्रिय रुग्णांची संख्येत मोठी घट झाली असून, सध्या 88 हजार 729 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. महाराष्ट्रात आज 503 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आजवर 1 लाख 31 हजार 605 रुग्ण मृत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 2.09 टक्के एवढा झाला आहे. रिकव्हरी रेट 96.43 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आतापर्यंत 4 कोटी 69 लाख 95 हजार 122 नमूने तपासण्यात आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 01 हजार 758 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 3 हजार 518 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.