मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 13 डिसेंबर 2025 (14:07 IST)

सोने-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, 2100 रुपयांनी वधारले

gold silver
सोन्या चांदीचे दर गगनाला भिडले आहे. अद्याप सोने चांदीचे दर वाढतच आहे. शुक्रवारी सोन्याच्या दरात 2,100 रुपयांनी वाढ झाली असून 10 ग्राम सोन्याचा भाव 1 लाख 31 हजार 300 रुपये झाला आहे. तर चांदीचे दर प्रतिकिलो 2,000 रुपयांनी वाढले आहे.सध्या चांदीचा दर 1 लाख 94 हजार रुपये प्रतिकिलो असून जीएसटीस चांदी 2 लाख रुपये झाले आहे. 
 गेल्या एका वर्षात चांदीच्या दरात दुप्पटीने वाढ झाली असून गेल्या 8 दिवसांत चांदीच्या दरात 15 हजार रुपयाने वाढले आहे. . दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि इतर शहरांमध्ये सोन्याचे दर नवीन उच्चांकावर पोहोचले.  या वर्षी आतापर्यंत चांदीच्या किमतीत 114% ने मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय चांदीच्या किमती प्रति औंस 61.60 डॉलरवर पोहोचल्या आहेत, ज्यामुळे देशांतर्गत किमती वाढल्या आहेत.
दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,30,470रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,19,610 रुपये आहे. मुंबई, चेन्नई आणि कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,30,320 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,19,460 रुपये आहे.
 
पुणे आणि बेंगळुरूमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,30,320 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,19,290 रुपये आहे. अहमदाबाद, जयपूर, भोपाळ आणि लखनऊ सारख्या प्रमुख शहरांमध्येही किमती याच श्रेणीत आहेत.
जर जागतिक परिस्थिती स्थिर राहिली किंवा रुपया कमकुवत झाला तर 2026 पर्यंत सोन्याच्या किमती 5% ते 16% पर्यंत वाढू शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
Edited By - Priya Dixit