बुधवार, 1 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 27 सप्टेंबर 2022 (17:40 IST)

अखेर मालिकेमध्ये ‘तारक मेहता’ यांची धमाकेदार एण्ट्री

sachin shroff
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’  छोट्या पडद्यावरील या लोकप्रिय मालिकेने नुकतीच 14 वर्षे पूर्ण केली. या  प्रवासात मालिकेत अनेक नवीन कलाकार आले तर काहींनी रामराम ठोकला. तसेच मालिकेत गेली 14 वर्ष ‘तारक मेहता’ साकारून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे अभिनेते शैलेश लोढा यांनी हा शो सोडला. आता या मालिकेत ‘तारक मेहता’ची एंट्री झाली आहे.
 
अभिनेते शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यापासून आता ही भूमिका कोण साकरणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक होते. शैलेश लोढा यांनी शूटिंग बंद केल्यामुळे ट्रॅक बदलले होते आणि तारक मेहता नवीन ऑफिसच्या सेटअप निमित्ताने बाहेरगावी गेल्याचे दाखवले होते.
 
अखेर या पात्राची पुन्हा एन्ट्री होत आहे. याचे संकेत निर्मात्यांनी यापूर्वीच दिले होते. आता निर्मात्यांना या भूमिकेसाठी नवा चेहरा सापडला आहे. 
 
आता सचिन श्रॉफ हे तारक मेहताची भूमिका साकारणार आहेत.  मालिकेत त्यांची जबरदस्त एण्ट्री होणार असून निर्मात्यांनी त्याचा एक प्रोमोही सादर केला आहे. आता गणेशोत्सवातच तारक गोकुलधाममध्ये एंटर होणार आहेत.