शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 28 एप्रिल 2024 (11:33 IST)

Sahil Khan Arrested: अभिनेता साहिल खानला अटक, महादेव बेटिंग ॲपवर मुंबई पोलिसांची कारवाई

Sahil Khan Arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी बॉलीवूड अभिनेता साहिल खानला मुंबई क्राइम ब्रँचच्या SIT ने अटक केली आहे. या अभिनेत्यावर बेटिंग साइट चालवण्याचा आणि सट्टेबाजीला प्रोत्साहन देण्याचा आरोप होता, या संपूर्ण प्रकरणाचा तपास बराच काळ सुरू होता आणि तपासात साहिल खानचे नाव पुढे आले होते, त्यामुळे पोलिसांना ही कारवाई करावी लागली.
 
अभिनेता साहिल खानला अटक
साहिल खान 'द लायन बुक ॲप' नावाच्या बेटिंग ॲपशी संबंधित होता, जो महादेव बेटिंग ॲप नेटवर्कचा देखील एक भाग आहे. या संपूर्ण प्रकरणात मुंबई पोलिसांच्या एसआयटीने यापूर्वीही अभिनेत्याची चौकशी केली होती. त्यानंतर साहिलने जामिनासाठी कोर्टात धाव घेतली, मात्र त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. साहिल खानला छत्तीसगड येथून ताब्यात घेण्यात आले असून तेथून त्याला मुंबईत आणले जात आहे. तो Lotus Book 24/7 नावाच्या बेटिंग ॲप वेबसाइटचा भागीदार आहे.