1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 मार्च 2020 (10:25 IST)

काय म्हणता, सईच्या पायाला फ्रॅक्चर झाले

sai tamhankar
अभिनेत्री सई ताम्हणकर ‘मिमी’ या हिंदी चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे. यावेळी राजस्थान येथे  चित्रीकरण झाल्यानंतर हॉटेलवर परतत असताना सईच्या पायाला दुखापत झाली असून पाय फ्रॅक्चर झाले आहे.
 
‘मला आई व्हायचंय’ या मराठी चित्रपटाच्या हिंदी रिमेक ‘मिमी’चे चित्रीकरण राजस्थानमधील मांडवा येथे सुरु आहे. चित्रपटाचे चित्रीकरण संपवून सई हॉटेलवर परतत होती. दरम्यान तिच्या पायाला दुखापती झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर तिचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.  चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यत्यय येऊ नये म्हणून सई अशाच अवस्थेत चित्रीकरण करणार असल्याचे कळतय. 
 
‘मिमी’ या चित्रपटात सई बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन लक्ष्मण उत्तेकर करत आहेत.