शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (10:27 IST)

काय म्हणता, परिणीती चोप्राचा 'हा' प्रयत्न फसला

कोरोना व्हायरसविषयी सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यत प्रत्येकजण जनजागृती करत आहे. असाच एक प्रयत्न बॉलिवुड अभिनेत्री परिणीती चोप्राने केला आहे. मात्र यासाठी तिने वापरलेली पद्धत नेटकऱ्यांना फार रूचला नसल्याचे दिसत आहे. 
 
परिणीतीनं तिच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून फोटो शेअर केले आहेत, फोटोंत तिनं चेहऱ्यावर मास्क लावला आहे. ‘दुखद आहे पण मला माहित आहे की, आत्ताची हिच स्थिती आहे. तुम्ही तुमची काळजी घ्या’ असा मेसेज लिहीत तिने आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो शेअर केले आहेत.
 
करोना व्हायरस हा संवेदनशील विषय असताना असे फोटो शुट कोणीही कसे करू शकते असा सवाल तिच्या चाहत्यांनी केला आहे. अशा पद्धतीने नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करत तिच्यावर टिका केल्याचं पाहायला मिळत आहे. ‘तुला करोनासारख्या विषयाबद्दल जनजागृती करायची होती तर, फोटोशुट करायची काय गरज’ असे नेटकऱ्यांनी तिला विचारत तिला ट्रोल केले आहे.