1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 19 ऑगस्ट 2020 (10:20 IST)

उपचारासाठी संजय दत्त कोकिलाबेन रुग्णालयात

/sajnay dutta
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला तिसऱ्या स्टेजचा फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे. संजय दत्त मंगळवारी मुंबईतील त्याच्या निवासस्थानाहून कोकिलाबेन रुग्णालयात जाण्यासाठी निघाला त्यावेळी छायाचित्रकारांनी त्याला गाठले.
 
संजय दत्त रुग्णालयात जाण्यासाठी निघाला त्यावेळी पत्नी मान्यता दत्त, बहिण प्रिया आणि नम्रता दत्तही त्याच्यासोबत होत्या. संजयने त्याच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या छायाचित्रकारांच्या दिशेने थम्सअपची खूण करुन आपण कॅन्सर विरोधातील लढाईसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. सोबतच संजय दत्तने त्याच्यासाठी प्रार्थना करण्याचेही आवाहन केले.