शुक्रवार, 8 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 27 जून 2020 (15:58 IST)

कोरोनाची कुष्णकुंजवर पुन्हा एन्ट्री

raj thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले कृष्णकुंजवर पुन्हा एकदा कोरोनानं धडक दिली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांपैकी तीन जणांना करोनाची लागण झाली होती. राज ठाकरे यांच्या दोन्ही वाहनचालकांना कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांनाही उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता राज ठाकरे यांच्या घरी कामाला येणाऱ्या नोकरासह आणखी एकाला कोरोनाची लागण झाली  आहे.
 
घरात काम करणाऱ्या दोन जणांचा कोराना तपासणीचा अहवाल पॅाझिटिव्ह आला आहे. यातील एक हा राज ठाकरे यांच्या घरी घरकाम करत होता. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. तर याआधी सुध्दा कोरोनाने कुष्णकुंजवर एन्ट्री घेतली होती. राज ठाकरे यांच्या सुरक्षा रक्षकांच्या ताफ्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. हे तिन्ही पोलिस करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.