मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 जुलै 2022 (21:37 IST)

सलमान खानने स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी केली

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानने स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी केली. पंजाबचे प्रसिद्ध गायक सुद्धू मुसेवाला यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान आणि त्यांचे पिता सलीम खान यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकीपत्रानंतर सलमान खानने ही मागणी केली आहे.
 
मुंबईतील वांद्रे परिसरात सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांचा उल्लेख करणारे एक पत्र सापडले होते. या पत्रात तुझा सिद्धू मुसेवाला करु, अशी धमकी सलमान खानला उद्देशून देण्यात आली होती. या धमकीपत्रानंतर खबरदारी म्हणून सलमानची सुरक्षा वाढवण्यात आली होती. तर या धमकीनंतर सलमान खानने आज मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फळसणकर यांची भेट घेतली. या भेटीत त्याने स्वसंरक्षणार्थ शस्त्र परवाना द्यावा, अशी मागणी त्याने मुंबई पोलिसांकडे केली आहे. तसा रितसर अर्जदेखील सलमानने केला आहे.