बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

एकाच दिवशी प्रदर्शित होणाऱ्या स्त्रीप्रधान सिनेमांमध्ये टक्कर

बॉक्स ऑफिसवर एकाच दिवशी म्हणजेच १४ जुलैला दोन स्त्रीप्रधान सिनेमे प्रदर्शित होणार आहे. श्रीदेवी यांचा ‘मॉम’ आणि श्रद्धा कपूर हिचा ‘हसीना’ हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. या दोन्ही सिनेमांचे वैशिष्ट्य म्हणजे हे दोन्ही सिनेमे स्त्रीप्रधान आहेत. ‘मॉम’ या सिनेमात श्रीदेवी एका कणखर स्त्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर दुसरीकडे श्रद्धा ‘हसीना’मध्ये कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीची म्हणजे हसीना पारकरची व्यक्तिरेखा साकारणार आहे.