गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (19:00 IST)

इम्तियाझ अलीच्या चित्रपटात सारासोबत तिचा क्रश कार्तिक

बॉलीवुडमध्ये केदारनाथ चित्रपटापासून पदार्पण करणारी अभिनेत्री सारा अली खान आपल्या चित्रपटांपेक्षा जास्त आपल्या वैयक्तिक बाबतींविषयी मीडियामध्ये चर्चेत असते. साराने जेव्हापासून करण जौहर आणि सैफ अली खानसमोर कार्तिक तिचा क्रश आहे हे सांगितले आहे तेव्हापासून या दोघांबद्दल अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या आहे. या सर्वात सारासाठी एक चांगली बातमी आली आहे. मीडिया अहवालानुसार हे दोघ लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. 
 
अशी बातमी बर्याच काळापासून ऐकायला येत होती की सारा अली खान आणि कार्तिक आर्यन एका चित्रपटात एकत्र काम करणार आहे, पण या बद्दल जास्त काही माहिती नव्हती. पण आता या बातमीची पुष्टी झाली आहे की सारा-कार्तिक इम्तियाझ अलीच्या पुढच्या चित्रपटात रोमांस करताना दिसतील. एका अहवालानुसार कार्तिक, सारा आणि रणदीप हुड्डा बर्याच काळापासून चित्रपटाची स्क्रिप्ट वाचत आहे आणि आता चित्रपट सुरू होण्यासाठी तयार आहे. इम्तियाज अलीच्या मागील चित्रपटांपैकी (तमाशा आणि हॅरी मेट सेजल) बहुतेक सीन्स परदेशात शूट करण्यात आले आहे. पण हा चित्रपट जास्त करून पंजाब आणि दिल्लीमध्ये चित्रित केला जाईल. कार्तिक आर्यन देखील या बातमीची पुष्टी करून चुकले आहे. 
 
दिग्दर्शक इम्तियाज अली ‘लव आजकल’ या चित्रपटाचे अनुकरण करणार होते. तथापि आतापर्यंत याच्या अंतिम नावावर निर्णय घेतला गेला नाहीये. म्हणूनच हा चित्रपट सध्या ‘लव आजकल 2’या नावानेच चर्चेत आहे.