गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मार्च 2019 (12:48 IST)

सलमान खान-संजय लीला भन्साळी एकत्र!

अभिनेता सलमान खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांची जोडी तब्बत 19 वर्षांनी मोठ्या पडद्यावर एकत्र येणार आहे. 'हम दिल दे चुके सनम'नंतर सलमानला घेऊन संजय लीला भन्साळी 'बाजीराव मस्तानी' करणार होते, मात्र ते शक्य झालं नाही. पण आता एक वेगळी प्रेमकथा घेऊन हे दोघं आपल्या भेटीला येत आहेत. या सिनेमाची स्क्रिप्ट फायनल झाली असून पटकथेवर काम सुरु असल्याचं समोर येत आहे. मात्र सिनेमाचं नाव आणि इतर माहिती अद्या समोर आलेली नाही. संजय लीला भन्साळी यांच्या या सिनेमात सलान असू शकतो, मात्र याची अद्याप घोषणा झालेली नाही. या सिनेमाचं शूटिंग 2019 च्या मध्यावधीत सुरु होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तर 2020 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. सलमान आणि संजय लीला भन्साळी यांनी 19 वर्षांपूर्वी हम दिल दे चुके सनम या सिनेमात काम केलं होतं. हा सिनेमा ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या सिनेमात सलानसोबत ऐश्वर्या राय आणि अजय देवगण मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर सलमान आणि भन्साळींची जोडी पडद्यावर कधी येणार याची त्यांचे प्रेक्षक वाट पाहात आहेत.